राज्यातील भाजपच्या ३ केंद्रीय मंत्र्यांचा दारूण पराभव
![Massive defeat of 3 Union Ministers of BJP in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Maharashtra-Lok-Sabha-Election-2024-780x470.jpg)
Loksabha Election 2024 | लोकसभेच्या निकालेचे चित्र स्पष्ट झालं आहे. देशात भाजपला मोठा झटका बसला आहे. यात विशेष करून महाराष्ट्रातील महायुतीला मोठा झटका बसला आहे. राज्यातील तीन केंद्रीय मंत्र्यांचा दारूण पराभव झाला आहे. यात भाजप नेते रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील पराभूत झाले आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेव दानवे पराभूत झाले आहेत. त्या ठिकाणी कॉंग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांचा विजय झाला आहे. गेल्या २० वर्षांपासून दानवे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर त्यापूर्वी ते आमदार देखील होते. यावेळी कल्याणराव यांच्या रुपात त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले होते. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे जालन्यातील राजकारण चांगलेच बदलले.
हेही वाचा – बच्चा बडा हो गया ! सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर रोहित पवारांचे ट्विट
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार तथा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा भास्कर भगरे यांनी पराभव केला. भगरे हे NCP शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. भास्कर भगरे यांनी लाखोंच्या मतांनी पराभव करत जायंट किलरची भूमिका निभावली आहे. भारतीय जनता पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या कपिल पाटील यांचा ७९ हजार ९१६ मतांनी पराभव केला आहे. बाळ्यामामा हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत.