breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण सुरूच

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. आज नवव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आता अशक्तपणा जाणवत असूनही बोलण्यासही त्रास होतो आहे.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. अंगात ताकद राहिली नाही. त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आहे. त्यामुळे उपोषण स्थळीच जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली आहे. पहाटेच त्यांना सलाईन लावली आहे. तर जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची वार्ता पसरल्याने जालना, औरंगाबादसह आजपासच्या जिल्ह्यातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीकडे यायला निघाले आहेत.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : महापालिका शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थी घडवावेत!

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज सकाळी अचानक उपोषण स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. आंदोलकांनाही शांतता राखण्याचं आवाहन केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button