breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आमरण उपोषण सोडायला तयार पण..’; मनोज जरांगे पाटील यांना निर्धार कायम

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर आमरण उपोषण सोडायला तयार पण आंदोलनाची जागा सोडणार नाही, असे स्पष्टच मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढच्या महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय द्यावा, असा इशारच जरांगे यांनी दिला आहे. तर हे उपोषण सोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि मंत्रिमंडळातील नेत्यांनी उपस्थित रहावं, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – आशिया चषकाच्या फायनलमध्ये पुन्हा IND vs PAK आमनेसामने?

‘या’ आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या..

  • अहवाल कसाही आला तरीही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं लागणार.
  • महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत तेवढे सगळे गुन्हे मागे घेतले जावेत.
  • जे अधिकारी दोषी आहेत त्याचं निलंबन करा.
  • उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ तसंच छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले हे सगळे तुमच्यासोबत आले पाहिजेत.
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजेच सरकार हे सगळं आम्हाला लेखी हवं आहे वेळेची मर्यादा घालून दिली आहे हे त्यात नमूद करावं.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button