breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

नारायण राणेंच्या ‘त्या’ विधानावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले..

पुणे : ९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. दरम्यान, यावरून मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते अकलूजमध्ये जाहीर सभेत बोलत होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र घ्यायला अडचण काय आहे? आपण आपल्या आजोबा-पंजोबांच्या रक्ताचे आहोत की नाही? आपला आजोबा-पंजोबा अडाणी होता बिचारा. आता आपण सुशिक्षित झालो, त्यानेच आपल्याला शिकवलं. रात्रंदिवस काबाड कष्ट केले, आपल्याला सुशिक्षित केलं. तो आपला आजोबा, पंजाबो, खापरपंजोबा स्वतःला कुणबी समजायचे. एखादा कोणाकडे मुलगी बघयाला गेले आणि कोणी विचारलं की तुमचा मुलगा काय करतो तर ते म्हणायचे आमचा मुलगा एकटा पंधरा एकर कुणबी करतो.

हेही वाचा – ‘पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही’; राज ठाकरे यांचं सूचक विधान

आपला आजा चपलेला पायताण म्हणायचा, पण आता पायताणाला चप्पल म्हणतात मग पायताण घालायची बंद करायची का? पूर्वी हॉटेलला हॉटेल म्हणायचे, आता नवीन शब्द आला रेस्टॉरंट, मग चहा प्यायचा बंद करायचा का? पूर्वी घराला वाडा म्हणायचे आता हाऊस म्हणतात मग झोपायचं बंद करायचं का? सुधारित शब्दाला अडचण काय? तुम्हाला घ्यायचं (कुणबी प्रमाणपत्र) तर घ्या नाहीतर घेऊ नका. तुम्हाला जबरदस्ती केली का कोणी? पण गोरगरिबांच्या लेकरांना घेऊ द्या. त्यांच्या आयुष्याची माती करू नका. त्यांना भविष्य घडवायचं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

मराठ्यांच्या ते हक्काचं आहे, त्यांना मिळू द्या. तुम्ही आमचे आदर्श लोक आहोत, महाराष्ट्रातील सगळे वरिष्ठ मराठे तुम्ही आदर्श आहात, तुम्ही नका विरोध करू, त्यांचं कल्याण होऊ द्या. ७५ वर्षांत जे पक्ष झाले, नेते झाले त्यांना मोठं करण्याकरता मराठा समाजाने खस्ता खालल्या आहेत. तुम्हाला उपकार फेडायचे नसतील तर नका फेडू पण, आरक्षणाला विरोध करू नका. ते मिळवण्याकरता मराठे खंबीर आहेत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button