breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर ठाम, जीआरमध्ये अजूनही बदल नाही

मुंबई : मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील गेल्या १२ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. सरकारकडून उद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. आमच्या जेवढ्या मागण्या होत्या, त्यापैकी एकही मागणी मान्य झाली नाही, त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, गुन्हे मागे घेण्याची प्रक्रियाही सुरू केलेली नाही. अधिकाऱ्यांवर बडतर्फीची एकही कारवाई केली नाही. ज्यांच्यामुळे गोळीबार झाला. ते मुंबईला शिष्टमंडळासोबत. म्हणजे अधिकारी समोर फिरत आहेत. त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजे, ते फिरत आहे. सक्तीच्या रजवेर पाठवणं याला कारवाई म्हणता येत नाही. तुम्ही या कारवाया कराल अशी आशा होती. तुम्ही तातडीने आदेश काढून दणादण कारवाई करायला पाहिजे होती, ती केली नाही. ७ सप्टेंबरच्या जीआरमध्ये दुरुस्ती केलेली नाही, त्यामुळे आम्ही उपोषण सुरूच ठेवणार आहोत.

हेही वाचा – जी-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे ‘भारत’ नावाचीच पाटी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्जुन खोतकर यांच्याकडे सरकारचा एक लिफाफा दिला. खोतकर यांनी हा लिफाफा घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर जरांगे यांनी लिफाफा उघडून पत्र वाचलं. मनोज जरांग यांनी ते पत्र वाचलं. त्यानंतर खोतकर आणि जरांगे यांच्यात काही काळ चर्चा झाली. जरांगे यांनी यावेळी आपल्या शिष्टमंडळासोबतही महत्त्वाची चर्चा केली. त्यानंतर भूमिका जाहीर केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button