Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांचा मृत्यदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर – ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला आहे. गौरी प्रशांत गडाख (वय 38) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज शनिवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली.
शनिवारी सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी नातेवाईकांना आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तर या प्रकरणी आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.





