Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

Maharashtra Politics: देवेंद्रजी, हम आपके साथ है। : आमदार शंकर जगताप

विधिमंडळ गटनेतेपदी निवड : मुख्यमंत्री होण्यासाठी केवळ औपचारिकता बाकी

पिंपरी-चिंचवड : ज्या माणसाने पाच वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करून नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व कसे असावे याचा आदर्श घालून दिला, त्या देवेंद्रजींना बदनाम करण्याची, त्यांना खाली खेचण्याची, त्यांचे पंख छाटण्याची मोहीमच विरोधकांनी गेल्या पाच वर्षांत चालवली. मात्र, त्यामुळे नाउमेद न होता देवेंद्र फडणवीस एकेक योजनांवर काम करत राहिले, विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत जावी यासाठी झटत राहिले. आमचे स्फूर्तीस्थान, प्रेरणास्थान असलेले देवेंद्रजी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र आनंदाने भरुन पावला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शंकर जगताप यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीने महाराष्ट्र विधिमंडळ नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. याबाबत आमदार शंकर जगताप यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आमदार शंकर जगताप म्हणाले की, आमचे स्फूर्तीस्थान, प्रेरणास्थान असलेले देवेंद्रजी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. सबंध महाराष्ट्र आज आनंदाने न्हाऊन निघेल. ज्या माणसाने पाच वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व करून नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व कसे असावे याचा आदर्श घालून दिला, त्या देवेंद्रजींना बदनाम करण्याची, त्यांना खाली खेचण्याची, त्यांचे पंख छाटण्याची मोहीमच विरोधकांनी गेल्या पाच वर्षांत चालवली. मात्र, त्यामुळे नाउमेद न होता देवेंद्र फडणवीस एकेक योजनांवर काम करत राहिले, विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत जावी यासाठी झटत राहिले. त्यामुळेच आज जाती, धर्म, लिंगभाव, आर्थिक उत्पन्न या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन त्यांना सर्वांनी कौल दिला. जनता एखाद्या नेत्याकडे बघून इतके भरभरून मतांचे दान टाकते, तेव्हा ती बघते त्या व्यक्तिमत्त्वातील आशा. देवेंद्रजींच्या आशादायी व्यक्तिमत्त्वात महाराष्ट्राच्या जनतेने हीच आशा बघितली आणि त्यामुळेच त्यांची उंची आणखी वाढली. … आणि म्हणूनच, देवेंद्रजी, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आम्हाला आणि महाराष्ट्राला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवाल, सन्मानाची वागणूक द्याल, कर्तृत्वाचा आदर्श दाखवाल, याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही फक्त हाक द्या, आम्ही ओ देऊ. तुमच्याबरोबर महाराष्ट्राचे भाग्यही उजाळणार याची आम्हाला खात्री आहे. म्हणून तुमच्यासारख्या भाग्यदूताचे आम्ही दूत बनू आणि तुम्हाला सदासर्वकाळ साथ देत राहू याची ग्वाही आजच्या मंगलदिनी देत आहोत. देवेंद्रजी तुम आगे बढो, हम हमेशा आपके साथ रहेंगे।, असेही आमदार शंकर जगताप यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button