breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

महाराष्ट्राला 2 कॅबिनेट मंत्रिपद, तर 4 राज्यमंत्रीपद, नेमकी कुणाकुणाला संधी?

नवी दिल्ली : अठराव्या लोकसभा निवडणुकीनंतर अखेर आज एनडीए आघाडीचं सरकार देशात स्थापन होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 69 खासदारांनी केंद्रीय कॅबिनेट आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाकुणाला संधी मिळेल? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडेल? याबाबत उत्सुकता होती. अखेर याबाबचं चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रपती भवनात आज मोदी 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधीचा शाही सोहळा आयोजित करण्यात आला. मोदी 3.0 सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 खासदारानी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी महाराष्ट्राला 2 कॅबिनेट मंत्रिपद मिळाली. तर 4 राज्यमंत्रीपदं देण्यात आली.

शपथविधीच्या आजच्या कार्यक्रमात सर्वात आधी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह हे लखनौ लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. राजनाथ सिंह हे 2014 ते 2019 या काळात देशाचे केंद्रीय गृहमंत्री होते. यानंतर 2019 ते 2024 राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अमित शाह यांच्यानंतर महाराष्ट्राचे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर मोदींचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते तथा उत्तर मुबई मतदारसंघाचे खासदार पीयूष गोयल यांनी केंद्रीय कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्राच्या आणखी 4 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण या चारही मंत्र्यांना केंद्रीय कॅबिनेट नाही तर राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली.

हेही वाचा – पहिल्याच डावात मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रिय मंत्री पदाची शपथ

महाराष्ट्रात ‘या’ खासदारांची राज्यमंत्रीपदी वर्णी

शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. तसेच त्याआधी त्यांनी आमदारकीचीदेखील हॅटट्रीक मारली होती. प्रतापराव जाधव यांची आता केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार दिला आहे.

भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचीदेखील मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रक्षा खडसे या तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित तरुण खासदार मुरलीधर मोहोळ यांनादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीदेखील आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोदींच्या नेतृत्वातील याआधीच्या सरकारमध्येही रामदास आठवले हे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. त्यांची आता पुन्हा राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.या कार्यकाळात ते केंद्रीय संरक्षण मंत्री राहिले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button