breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

लोकसभा निवडणुकीची घोषणा! महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान, वाचा सविस्तर..

Lok Sabha Election 2024 | देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील मतदान कार्यक्रम आज जाहीर केला. देशात लोकसभा निवडणूक ५४३ जागांवर निवडणूक होणार आहे. त्यानुसार १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, महाराष्ट्रातही ५ टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानुसार, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

देशात सात टप्प्यात निवडणूक होणार

फेज १ – १९ एप्रिल
फेज २ – २६ एप्रिल
फेज ३ – ७ मे
फेज ४ – १३ मे
फेज ५ – २० मे
फेज ६ -२५ मे
फेज ७ – १ जून

हेही वाचा    –    लोकसभा आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, बैठकीत महत्वाचे निर्णय 

महाराष्ट्रात कोणत्या दिवशी कोणत्या मतदारसंघात मतदान

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button