स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार, २५ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्ट देणार निकाल
![Local body elections to be held soon, Supreme Court to give verdict on February 25](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Local-body-elections-to-be-held-soon-Supreme-Court-to-give-verdict-on-February-25-780x470.jpg)
मुंबई | सुप्रीम कोर्टातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकची सुनावणी निकाली लागणार आहे. येत्या २५ फेब्रुवारीला कोर्ट देणार निकाल असं समजत आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष संघटनात्मक आपापली मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. लवकरच कोर्टाचा निकाल येईल व त्वरित निवडणुका लागतील असं दिसतं आहे.
स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी असतो. त्यात प्रभाग रचना व निवडणुका उरकायच्या असतात. जर २५ फेब्रुवारी रोजी कोर्टाचा निकाल लागला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात अगदी प्रभाग रचना जाहीर केल्या जातील. १५ दिवसांच्या आत त्यावर हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यानंतर एप्रिल महिन्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जातील व मे महिन्यात मतदान आणि निकाल असेल.
हेही वाचा : ३८९ द्या अन् मिळवा भाड्याने बॉयफ्रेंड; ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बेंगळुरूमध्ये अजब ऑफर!
सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुक आयोगाने जुन्या जनगनेच्या आधारे व नवीन मतदार नोंदणीच्या आधारे प्रभाग रचान आधीच तयार करुन ठेवली आहे. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर त्वरित मुंबई उपनगर (MMR Region), Pune, PCMC(PMRDA), नाशिक, नागपूर, संभाजीनगर या भागतील मुख्य अधिकाऱ्याची महत्व पूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या समवेत मुंबई येथिल सहियाद्री अतिथी गृहवर संपन्न झाली.