breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संजय राऊतांकडून शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची यादी जाहीर

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत १२,००० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाशी संबंधित १५ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली आहे. दरम्यान, यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश सहकारी कारखान्यात पराभव का झाला? भ्रष्टाचारामुळेच त्यांचा पराभव झाला. तुमच्या भाजपाच्या लोकांनीच त्यांचा पराभव केला. राधा कृष्ण विखे पाटील यांच्या संस्थानात झाकीर नाईक ४.५ कोटी रूपये का देतो. फडणवीसांची हिंमत आहे का याबद्दल चौकशी करण्याची. अन्यथा गृहमंत्रालयाने ईडीला पत्र लिहावं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यात झाकीर नाईक साडेचार कोटी रूपये का पाठवतो. याच झाकीर नाईकवर केंद्र सरकारने टेरर फंडिंगचा आरोप केला आहे. ते साडेचार कोटी झाकीर नाईकने का पाठवले, ते पैसे कसे आले, त्या पैशाचे काय व्यवहार झाले होते. त्यासंबंधी काय हालचाली होत्या.

हेही वाचा – Pune : दर्शना पवार खून प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला अटक

गृहमंत्री असूनही फडणवीसांकडे याबद्दलची माहिती नसेल तर ती आम्ही देतो. आमदार राहुल कुल यांच्या ५०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत. यासंदर्भात काल आणि परवा ईडीकडे माहिती पोहोचली आहे. राहुल कुल हे भाजपाचे दौंडचे आमदार आहे. फडणवीसांचे एकदमक खास..यावर काय करतायत फडणवीस, असं संजय राऊत म्हणाले.

मंत्री दादा भुसे यांच्या १२८ कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची माहिती मिळाली आहे. याचे पुरावे ईडीकडे पोहोचले आहेत. उद्या अब्दुल सत्तारांच्या ७५० कोटी रूपयांच्या मनी लाँड्रिंगचे कागद ईडीकडे जातील, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button