breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कुडाळच्या मतदारांनी नारायण राणेंना व त्यांच्या मुलांना जागा दाखवली – वैभव नाईक

रत्नागिरी |

राज्यात ओबीसी आरक्षाविना पार पडलेल्या भंडारा आणि गोंदियामधील जिल्हा परिषदांच्या २३ व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठी निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतींच्या ३३६ जागांसाठी आणि १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ जागांसाठी मंगळवारी मतदान झालं. या सर्व ठिकाणच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक आणि शिरोळ, नागभीड , जत , सिल्लोड , फुलंब्री , वानाडोंगरी आणि ढाणकी या नगरपरिषदांमधील रिक्त जागा यासह ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार, कृषी मंत्री दादा भुसे, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराज देसाई, सेना नेते रामदास कदम, जळगावात एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे, रोहित पवार, माजी मंत्री राम शिंदे, खासदार प्रफुल पटेल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button