‘पैसे कसे ढापायचे हे शरद पवार..’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
पिंपरी | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिवकू शकतं. कोविड काळात त्यांचा वसुलीचा धंदा सुरू होता, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकतं. कोविड काळात त्यांचा वसुलीचा धंदा सुरू होता. पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा बारा वर्षांत एका दमडीचाही व्यवसाय झालेला नाही.
हेही वाचा – ‘मंदिर वही बनाएंगे’च्या घोषणेवरून संजय राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल
अचानक मार्च २०२१ मध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या बँक खात्यातून ४३५ कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले आहेत. यांचं कॉन्ट्रिब्यूशन किती? केवळ एक लाख. मग, त्यांच्या खात्यात जमा झालेले ४३५ कोटी हे कमिशन आहे का? असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.