Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

‘हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाच्या प्रमोशनला ‘द सलमान खान’ हा अस्सल पठाण’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

मुंबई | प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर-२’ चा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या ट्रेलर लाँचला अनेक मराठी अभिनेते हजर होते. त्यात अभिनेता सलमान खान याने देखील हजेरी लावली होती. यावरून अभिनेते किरण माने यांनी ‘धर्मवीर-२’ च्या टीमवर निशाणा साधला आहे. त्यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

अभिनेते किरण मानेंची काय पोस्ट आहे?

छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्माचा आदर करणारं हिंदुत्व शिकवलंय आपल्याला. हिंदुत्व म्हणजे मुस्लीमद्वेष नव्हे, हे पट नव्हतं ना? हा घ्या ढळढळीत पुरावा..’हिंदुत्वाची गोष्ट’ सांगणाऱ्या सिनेमाच्या प्रमोशनला सुद्धा वन अॅन्ड ओन्ली, ‘द सलमान खान’हा अस्सल पठाण लागला! भारी वाटलं. धर्म ठेकेदारांना सलमानभाईच्या मागेपढे करताना बघून लै लै लै भारी वाटलं, असं किरण माने यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा      –      गौरी गणपती उत्सवानिमित्त १ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

 

दरम्यान, धर्मवीर-२ या चित्रपटात प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या भूमिकेत तर क्षितिज दाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button