Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनराजकारणराष्ट्रिय

‘आपल्या देशातील नेते अशिक्षित, ज्यांच्याकडे योग्य दृष्टीकोनही नाही’; बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं विधान

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक काजोल आजही सिनेमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. दरम्यान, ती सध्या एका विधानामुळे चांगलीच चर्चेत आहे. काजोलने आपल्या देशातील राजकीय नेत्यांबद्दल एक वक्तव्य केलं आहे. आपल्या देशातील नेते अशिक्षित असल्याचं काजोलनं म्हटलं आहे. ती आपल्या ‘द ट्रायल’ या वेबसीजच्या निमित्ताने एका कार्यक्रमात बोलत होते.

काजोल म्हणाली की, भारतातील बदल हे फार मंद गतीने होत आहेत, कारण आपण आपल्या परंपरा, विचार यात अडकलो आहोत आणि याचा अर्थातच संबंध शिक्षणाशी आहे. आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत, त्यांच्याकडे शिक्षण नाही. मला माफ करा, पण मी बाहेर जाऊन हे पुन्हा सांगेन. देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. पण यातील अनेक नेते असे आहेत, ज्यांच्याकडे योग्य दृष्टीकोनही नाही आणि तो फक्त शिक्षणामुळे येतो.

हेही वाचा – Threads ॲपचा १० मिलियन युझर्सचा टप्पा पुर्ण, ॲप डाउनलोड कसं करायचं?

https://twitter.com/itsKajolD/status/1677596396659302405

काजोलच्या या वक्तव्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तर काहींनी तिचं म्हणणं योग्य असल्याचं म्हटलं आहे. काजोल सध्या तिच्या ‘द ट्रायल’ या वेबसीरिजद्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ही वेबसिरीज १४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती जिशू सेनगुप्ता तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button