‘अजितदादा परत या, हवं तर मी राजकाण सोडतो’; जितेंद्र आव्हांडांचं भावनिक आवाहन
![Jitendra Awhad said that Ajitdada come back, I will leave Rajkan if you want](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/ajit-pawar-and-Jitendra-Awhad-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे राज्यातील राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरूवात झाली आहे. अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवार यांना बडव्यांनी घेरलं आहे असं म्हणत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना भावनिक साद घातली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांनी परत यावं, हवं तर मी राजकारण सोडतो, अशी भावनिक साद जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शरद पवार यांच्या भोवती काही मंडळींनी कोंडाळं केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी अजित पवार यांना परत येण्याचे आवाहन केले. जयंत पाटील यांना पण सोबत घेऊन जातो. आम्हाला काहीच नको.
हेही वाचा – दुसऱ्याच्या घरी डोकावण्यापेक्षा तुमचे घर सुरक्षित आहे की नाही ते पहा
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार आपले दैवतच आहे, मी सांष्टांग नमस्कार करुन विनंती करतो. काही आमदारांची ससेहोलपाट होतं आहे, इकडे आड-तिकडे विहीर, असं झालंय. पण, काही असे लोकं बरोबर घेतले की, त्या संघटनेचं वाटोळं करतील. उदाहरण द्यायचं झालं तर तो ठाण्याचा पठ्ठ्या. त्यांच्यामुळे गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक आपला पक्ष सोडून गेले, सुभाई भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले, वसंत डावखरे मला म्हणायचे, साहेब का म्हणून ह्याला मोठं करतात, असं अजित पवार म्हणाले.