करोनानंतर मी काय मेलो का? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
![Jitendra Awad said why did I die after Corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Jitendra-Awhad-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीमुळे दोन वेगळे गट पडले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला पालकमंत्रीपद देऊच दिलं नाही. ते फक्त एकनाथ शिंदे व अजित पवार मिळून ठरवत होते. मी अजित पवारांना स्वत: भेटून सांगितलं होतं की मला पालकमंत्रीपद द्या. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: भेटून म्हणाले की ‘जितेंद्र, आम्हाला रायगड हवं होतं. आम्ही तुम्हाला पालघर द्यायला तयार होतो. मी खास तुझ्यासाठी पालघर सोडलं होतं. पण ते म्हणाले अजित पवार कुठल्याही परिस्थितीत रायगड सोडायला तयार नाहीत. रायगड त्यांना आदिती तटकरेला द्यायचं आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षणाबद्दल सयाजी शिंदे यांचं मोठं विधान; म्हणाले..
माझा प्रश्न त्यांना तेवढाच होता की मी काय ज्येष्ठ मंत्री नाही? मी या पक्षाचा कार्यकर्ता नाही? मला करोना झाला आणि दोन तासांत तुम्ही पालकमंत्रीपदावरून काढता? त्यानंतर करोना झालेल्या किती जणांना काढलं तुम्ही? या पक्षात सावत्र होतो का मी? का नाही सांगितलं की करोना झालाय तर बरा होईल आणि मग पुन्हा घेईल पालकमंत्रीपदाचा कार्यभार? मी झालो ना बरा? मेलो नाही ना? तुम्हाला स्वत:ला करोना झाला, का नाही राजीनामा दिला? मंत्रीमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांना करोना झाला, मग त्यांचा राजीामा का नाही घेतला? एकट्या जितेद्र आव्हाडचा राजीनामा घेतला, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.