Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘काका का? कारण पुतण्या गद्दार निघाला’; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर खोचक टीका

मुंबई | निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरू झाल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात शरद पवारांवर टीका केली. यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. अजित पवार यांनी काका का? असं म्हटलं. त्यावर कारण पुतण्या गद्दार निघाला. वेळ अशी येईल की वेळ येईल विचारण्याची काका का असे करता माफ करा चुकी झाली आणि या वेळेस २०१९ सारखी माफी नाही. गद्दारांना माफी नाही. असं म्हणत आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे.

हेही वाचा     –     दिल्ली मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या नावावर आहे का? संजय राऊतांचा सवाल

जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला अजित पवार गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बेशक उंगली उठा मेरे किरदार पर | शर्थ ये है, तेरी उंगली बेदाग होनी चाहिये || असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे. तर सोबत तथाकथितपुरोगामी असा हॅशटॅग देखील जोडला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button