‘अजितदादा ४८ च्या ४८ जागा निवडूण आणू शकतात’; जितेंद्र आव्हाडांचा टोला
मुंबई : शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आहे. यावरून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार मोठे नेते, ते कुणालाही पाडू शकतात, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, दमदाटीकरणं हाच अजित पवारांचा स्वभावदोष आहे. शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ‘ए गप्प बस रे’, ‘उठू नको’ असं अजित पवार बोलत होते. पण, तुम्ही घरी नसून सार्वजनिक जीवनात आहात. त्यामुळे अशी विधान करणं योग्य नाही. तसेच, तुला पाडून दाखवतो, अशी वक्तव्य करता येत नाही.
हेही वाचा – पैसा कमावण्याच्या बाबतीत देशातील हे राज्य आघाडीवर? महाराष्ट्राची स्थिती काय?
अजित पवार मोठी माणसं आहेत. ते कुणालाही पाडू शकतात आणि ४८ च्या ४८ जागा निवडून आणू शकतात. प्रत्येकाला घाबरवणं हे कुणालाही शक्य होत नाही. जगात माणूस यमाला घाबरत नाही. त्यामुळे बाकीच्यांना कशासाठी घाबरायचं, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. प्रत्येकाला घाबरवण कोणाला शक्य होत नाही. या जगात लोक यमालाही घाबरत नाहीत, तो कधीतरी येणारच. तर बाकीच्यांना काय घाबरायचं? असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.