ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जयंत पाटीलांचे खंडणी शब्दावर स्पष्टीकरण

पुरवी खंडणी या शब्दाला पर्याप्त शब्द खंड,प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी ...

मुंबई: ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कॉनक्लेव्हमध्ये बोलताना काल जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतमध्ये खंडणी वसूल केली असं विधान केलं. त्यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेतला आहे. जयंत पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली आहे. जयंत पाटील यांनी आज त्यावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं. जयंत पाटील खंडणी या आपल्या शब्दावर ठाम आहेत. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना इतिहासातील काही दाखले दिले. खंडणी हा शब्द कसा योग्य आहे ते त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

भाजपाला इतिहास माहित नाही. यापूर्वी अनेकदा मी त्याच वर्णन करताना कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चरित्र लेखमालेत उल्लेख केला आहे. दुसऱ्यांदा सूरत लुटली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सूरतेच्या जनतेला उद्देशून पत्र लिहिलं. प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी बिनबोभाट पावती केली, तर तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भिती उरणार नाही. शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिलय. हे भाजपवाले काय सांगतात. यांना इतिहास माहित नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

‘औरंगजेबाकडून प्रति हल्ला झाला असता’

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरज काबीज केली, हातात ठेवली असं झालं नाही. महाराज तिथे गेले, हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणची सगळी लूट एकत्र करुन परत आणली. चार-पाच दिवस फार कमी काळ तिथे होते. कारण औरंगजेबाच सैन्य तिथे येऊन प्रति हल्ला झाला असता. या सगळ्याचा विचार करुन तिथे गेले. आपल इसप्ति साध्य केलं, परत आले. मला वाटतं भाजपाचा इतिहास कच्चा आहे. त्यांनी जुने लेख, कांदबऱ्या वाचव्याात, असं जयंत पाटील म्हणाले.

‘खंडाची पुढे खंडणी झाली’

पुरवी खंडणी या शब्दाला पर्याप्त शब्द काय होता? हे सांगितलं तर बर होईल. आधी खंड म्हणायचे, तुम्ही तुमच्या उत्पन्नातला खंड आम्हाला द्या, आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही. खंडाची पुढे खंडणी झाली. आता गुन्हेगार मागतात ती खंडणी वेगळी. खंड किंवा खंडणी मागणं म्हणजे तिथे जाऊन सामर्थ्य दाखवणं, युद्ध लढण ही माझी क्षमता आहे. मी इथे येऊ नये असं वाटत असेल तर तो खंड आम्हाला द्या. अशी ती व्यवस्था पूर्वी होती, असं जयंत पाटील म्हणाले.

‘शब्दच्छल करण्याचा प्रयत्न हास्यास्पद’

भाजपाला काही चान्स मिळत नाहीय. त्यांच्या सरकारच्या काळत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यांच्या विश्वाहर्तेवर शंका निर्माण झाली. आता कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझ्या विधानावरुन शब्दच्छल करण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button