Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चिंचवडमधील वाहतुकीत बदल, अशी असणार वाहतुक

पिंपरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या (६ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आदेश दिले आहेत.

अशी असणार वाहतुक

पिंपरी-चिंचवडमधील महावीर चौकाकडून चिंचवड गावात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. ही वाहने महावीर चौकातील वाहतूक खंडोबा माळ चौकाच्या दिशेला वळवली जाणार आहे.

हेही वाचा – औद्योगिक क्षेत्रात सामुदायिक ‘सोलर प्लँट’साठी पुढाकार!

तर दर्शन हॉल लिंकरोड येथून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. ही सर्व वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडे वळवली जाणार आहे.

रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर चौक अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास बंदी असणार आहे. ही सर्व वाहने वाल्हेकरवाडी बिजलीनगर मार्गे वळवली जाणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button