breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

थोड्याच वेळात ठरणार गावचा कारभारी? कोणत्या पक्षाचं होणार पारडं जड?

Gram Panchayat Election Results 2023 : राज्यातील ग्रामपंचायतींसाठी काल (५ नोव्हेंबर) मतदान पार पडलं. यामध्ये १८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. राज्यभरात अंदाजे ७४ टक्के मतदान झालं आहे. मात्र आज राज्यातील ग्रामपंचायतीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. तसेच या निवडणुकीत सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे हा निकाल कसा लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा – ‘अजित पवारांनी माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं’; अजितदादांच्या आईकडून इच्छा व्यक्त

या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला :

या ग्रामपंचायत निवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, गुलाबराव पाटील, शहाजी बापू पाटील आदी नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button