आता गाईच्या शेणापासून ‘पेंट’; भाजपाकडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना !
पिंपरी | प्रतिनिधी
भाजप कडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी पाऊल उचलले आहे. गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेले पेंट लॉंन्च करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशअध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी या बाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यामुळे पशुपालन करणाऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याचे त्यांनी ट्वीटद्वारे सांगितले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यसाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळावे म्हणून गाईच्या शेणापासून बनविलेले ‘वैदिक पेंट’ भाजपकडून लॉन्च केले जाणार आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून लवकरच हे पेंट लौचं केले जाणार असल्यची माहिती त्यांनी दिली. डिस्टेम्पर आणि इमल्शनमध्ये येणारा हा पेंट इको फ्रेंडली, नॉन टॉक्सिक, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि वॉशेबल असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच केवळ चार तासात हा पेंट सुकणार असल्याची त्यांनी दावा केला. यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ५५ हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.





