breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘अजित पवारांनी माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं’; अजितदादांच्या आईकडून इच्छा व्यक्त

पुणे : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काल ५ नोव्हेंबरला मतदान पार पडले. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली.

अजित पवार आजारी असून त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे ते मतदानासाठी येऊ शकले नाहीत. १९५७ सालापासून मी मतदान करतेय. पूर्वी सुरुवातीला काटेवाडीत काहीच नव्हतं. पण माझ्या सुनेमुळे काटेवाडीत भरपूर बदल झाले. अजित पवारांवर लोकांचं प्रेम आहे. पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की दादांनीच मुख्यमंत्री व्हावं. माझं वय आता ८६ वर्षे आहे, त्यामुळे माझ्या डोळ्यादेखतच (माझ्या हयातीत) मुलाने मुख्यमंत्री व्हावं. बारामती आपलीच आहे, लोकांचंही दादांवर प्रेम आहे, आता पाहुयात, असं आशाताई पवार म्हणाल्या.

हेही वाचा – पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत थांबलेल्या तरूणाची चाकूने भोसकून हत्या

दरम्यान, यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थातच कुठल्या आईला तसं वाटणार नाही, अशी सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button