Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण मी कोणाचा पाच पैशांचा मिंधा नाही”, अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar Pune Speech : “माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, मात्र मी कोणाचा पाच पैशांचा मिंधा नाही. समोर बसलेल्या लोकांनी सांगावं की कुठलंही काम करण्यासाठी अजित पवारांनी कधी पैसे घेतले का?” असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यातील एका प्रचारसभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले, “सत्तेत असल्यास आपल्या मतदारसंघाचा, भागाचा, जिल्ह्याचा विकास करता येतो.”

अजित पवार म्हणाले, “माझ्यावर भ्रष्टाचाराचे, ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले गेले. मात्र, मी कोणाचा पाच पैशांचा मिंधा नाही. आज इथे दिलीप मोहिते पाटील बसले आहेत, कैलास, किरण, अरुण आणि आपले इतर अनेक सहकारी बसले आहेत. लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. इतक्या वर्षांपासून मी राजकारणात आहे, सामाजिक जीवनात काम करतोय. इथल्या एका माणसाने उठून सांगावं की अजित पवारांनी एखादं काम करत असताना कायतरी चिरीमीरी घेतली किंवा एखाद्या कामासाठी चिरीमिरी द्यावी लागली आणि मग आमचं काम झालं. उलट माझ्या कामाच्या बाबतीत सगळे अधिकारी टरकून राहतात. त्यांना भिती असते की याला (मला) समजलं तर काही खरं नाही.

हेही वाचा –  डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची अभिमानास्पद कामगिरी

तत्पूर्वी अजित पवार यांनी माळेगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा पुरस्कृत जनमत विकास आघाडीच्या वतीनं आयोजित माळेगावमधील प्रचाराच्या सांगता सभेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी माळेगावच्या विकासासाठी या निवडणुकीत उभ्या केलेल्या आमच्या सर्व उमेदवारांना माळेगावकरांचं पाठबळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले, “सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाचा गाडा पुढे जात असतो, प्रश्न सुटत असतात, हे आम्ही लक्षात ठेवून आहोत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचं अनुकरण आम्ही करतो. अंडरग्राउंड ड्रेनेज, अरुंद रस्ते, गोरगरिबांसाठी घरकुल कार्यक्रम आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्ही कार्यतत्पर आहोत. पुढील ५ वर्षांकरिता जनमत विकास आघाडीला माळेगावकरांच्या मजबूत पाठिंब्याची गरज आहे.

अजित पवार म्हणाले, “केंद्र आणि राज्यातल्या योजना, जिल्हा वार्षिक योजना, CSR फंड या सगळ्यांचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. जनकल्याणासाठी आम्ही स्वतःला समर्पित केलेलं आहे. त्यामुळे माळेगावकरांनी त्यांचं पवित्र असं बहुमोलाचं मत येत्या २ डिसेंबरला घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून आमच्या १८ उमेदवारांना द्यावं.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button