Breaking-newsपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची अभिमानास्पद कामगिरी

शिक्षण विश्व: शिर्डी अहिल्यानगर येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेतून निवड

पिंपरी चिंचवड: शिर्डी अहिल्यानगर येथे 20 ते 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेतून पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एस पी पी यू विभागीय स्तरावरील स्पर्धेत डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बुद्धिबळ संघाने उल्लेखनीय कामगिरी करत सहभाग नोंदवला

या स्पर्धेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पश्चिम विभागीय अंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी सिद्धांत पितलावार (कम्प्युटर),मित भट्टड, (ईएनटीसी), तनिश गुप्ता (एआयडीएस) या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे

महाविद्यालयातील खेळाडूची पहिल्यांदाच ए आय यू वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड झाली असून हा डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे

हेही वाचा –  एमआयटी कॉलेजतर्फे मतदान जागरूकता रॅली!

डी वाय पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्सचे ट्रस्टी तेजस पाटील यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
कॅम्पस डायरेक्टर रिटायर्ड अॅडमिरल अमित विक्रम यांनी संघाच्या यशाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले
डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रिन्सिपल डॉ पी मालती यांनी सर्व खेळाडूंचे स्वागत करत स्पर्धेतील विजय आणि निवड हे महाविद्यालयासाठी अभिमानाचे असल्याचे सांगितले
कॉलेजचे डीन अॅडमिनिस्ट्रेशन डॉ एस एस सरनोबत आणि रजिस्टर प्रशांत भालेराव यांनीही संघाचे अभिनंदन केले

शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक आबाजी माने यांनी संघाच्या यशात प्रशिक्षणाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगत ही कामगिरी महाविद्यालयासाठी अभिमानाची असल्याचे नमूद केले

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button