देवेंद्रजींना मी आधीच सांगितलं होतं, शिवसेना काँग्रेस–राष्ट्रवादीकडे वळू शकते; अमृता फडणवीसांचे मोठे विधान

मुंबई | महाराष्ट्रात २०१९ मध्ये झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग हा राज्याच्या राजकीय इतिहासातील अनपेक्षित प्रयोग होता. भाजप–शिवसेना युतीने निवडणूक लढवूनही, मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. याबाबत अमृता फडणवीस यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, की मी देवेंद्र फडणवीस यांना कधीही राजकीय सल्ला देत नाही. पण कधी कधी माझे काही टोले असतात ते खरेही होतात. २०१९ मध्ये निवडणुकीनंतर काही समीकरणं घडली होती, भाजपाला १०५ जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेला एवढ्या मिळाल्या की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसह गेले असते तर त्यांची सत्ता आली असती शिवाय तो प्रयोग झालाच. मी निवडणुकीच्या आधीच मी देवेंद्र फडणवीसांना विचारायची की तुमच्या दोन पक्षांची नाही पण तीन पक्षांची चांगली संख्या आली आणि शिवसेना जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससह गेली तर काय? मी निवडणुकीच्या आधीच देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला होता. कारण माझ्या मनात तशा शंका आल्या होत्या. देवेंद्रजींनी मला ठामपणे सांगितलं होतं की असं काही होईल. शिवाय उद्धवजी माझ्याही जवळचे आहेत त्यामुळे मला वाटत नाही की असा धोका आपल्याशी होईल. पण मी माझी शंका बोलून दाखवली होती.
हेही वाचा : ..तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल; अंजली दमानिया यांचा घणाघात
तुम्हाला अशी शक्यता का वाटली होती? असं विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, मी जे काही राजकारण पाहिलं आहे त्यावरुन मी मला ती शक्यता वाटली होती. मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा पाहिलं की लोक त्या वेळेचा विचार करतात. आज तुम्ही कसे जिवंत राहू शकता? हे पाहतात. मला वर जायचं आहे तर कुणाच्या डोक्यावर पाय देऊन जाऊ शकतो हे पाहात. मी देवेंद्रजींना शंका बोलूनही दाखवली होती. पण त्यांना माणुसकीवर विश्वास होता. विश्वास ठेवण्यावर विश्वास होता. त्यामुळे त्यांचं मन भरकटलं नाही की असं होऊ शकतं. पण नंतर काय झालं ते सगळ्यांनी पाहिलंच.




