‘ना टायर्ड हूँ! ना रिटायर्ड हूँ!’ शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला
मुंबई : अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत रिटायर्ड कधी होणार? असा सवाल केला. यावरून आता शरद पवार यांनी अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ना टायर्ड हूँ! ना रिटायर्ड हूँ! या अटलबिहारी वाजपेयींच्या ओळींचा उल्लेख करत अजितदादांना टोला लगावला आहे.
शरद पवार म्हणाले की, वय होतं यात काही वाद नाही. पण तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर वय साथ देतं. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं वय ८४ होतं. ते ज्या जोमाने काम करायचे तो अनुभव थक्क करणारा होता. मी आज रस्त्याने येत असताना लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव मी पाहिले. सामान्य लोकांच्या चेहऱ्यांमधून जो आत्मविश्वास होता त्यामुळे मला आनंद आहे.
हेही वाचा – मनसे-शिवसेना युतीच्या चर्चांवर अमित ठाकरेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले..
छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आमची इच्छा होती की त्यांनी विधानसभेत आवश्यकता आहे. त्यानंतर येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवली. १९८६ मध्ये मी काँग्रेसमधून बाहेर पडलो वेगळा पक्ष निवडला होता तेव्हा नाशिक जिल्ह्याने आम्हाला विजयी केलं होतं. जनार्दन पाटील हे येवल्यातून दोनदा निवडून आले होते. मारोतराव पवारही निवडूनही आले होते. त्यामुळेच आम्ही भुजबळांना सेफ जागा दिली होती. त्यावेळी तशी चर्चा झाली आणि तो निर्णय घेतला होता, असं शरद पवार म्हणाले.
मी इथे येत असताना आम्हाला सगळ्यांना म्हणजे मी, जितेंद्र आव्हाड, अमोल केल्हे, सुप्रिया सुळे आम्हा सगळ्यांचं लोकांनी स्वागत केलं. आनंद एका गोष्टीची आहे की वरूणराजाने स्वागत केलं. नाशिक जिल्ह्यात मी आत्ताच विचारात होतो की पावसाटी स्थिती काय आहे? मला हे सांगण्यात आलं की रिमझिम आहे. पण पुरेसा पाऊस झालेला नाही, असंही शरद पवार म्हणाले.