Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनसे-शिवसेना युतीच्या चर्चांवर अमित ठाकरेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले..

मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मुंबई, पुणे शहरात कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित ठाकरे म्हणाले, सध्याच्या राजकीय चिखलात आम्ही नाहीत याचा मला अभिमान आहे. सध्या फक्त राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत लोकांच्या मनात काय आहे, हे कुणीही विचारत नाही. त्यामुळेच ‘एक सही संतापाची’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्याची ही परिस्थिती बदलण्यासाठी राज ठाकरे यांना लोकांनी सत्तेत बसवलं पाहिजे.

हेही वाचा – ‘३ इडियट्स’ सिनेमाचा सीक्वेल लवकरच येणार; सिनेमातील अभिनेत्याची माहिती

आम्ही या राजकीय चिखलात नाही याचा अभिमान आहे. एका आमदाराचे आम्ही शंभर करू परंतु राजकारणाचा चिखल करणार नाहीत. दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा एक भाऊ सत्तेत येणं गरजेचे आहे ते म्हणजे राज ठाकरे इतर कोणी नाही, असंही अमित ठाकरे म्हणाले. सोबतच सध्या पक्षाचे दौरे सुरू होत आहेत. याशिवाय मुंबईत ही मेळावा होणार असून सध्या तरी आम्ही शांततेत पक्ष बांधत आहोत. मनसेच्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळालं, असं अमित ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button