breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ठाणे जिल्ह्यात मतमोजणीच्या किती फेऱ्या, मोठी अपडेट काय?; यंत्रणा सज्ज

मुंबई : 18 व्या लोकसभेसाठी मतदानाच्या सहा फेऱ्या पार पडल्या असून सातवी फेरीचे मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. ठाणे लोकसभेसाठी मतदान 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात झाले. ठाण्यासह देशभरातील मतदानाची मोजणी येत्या 4 जून रोजी होत आहे. ठाण्यातील मतमोजणी 4 जूनला सकाळी 8 वाजता सुरु होत आहे. मतमोजणीसाठी ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोडवरील कावेसर येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूलमध्ये पार पडणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहीती ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली आहे.

ठाण्यातील मतमोजणीकरीता मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण शिबीर नुकतेच पार पडले आहे. मत मोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम दि. 3 जून 2024 रोजी मतमोजणी स्थळी सकाळी 11.00 वाजता होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 14 या प्रमाणे एकूण 84 टेबल्सवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 1 सुपरवायझर, 2 मतमोजणी सहाय्यक व 1 सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत. तर प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी सुपरवायझर, 1 पर्यवेक्षक आणि 1 मतमोजणी सहायक, 1 शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच स्ट्राँगरुममधून ईव्हीएम मशीन आणण्यासाठी प्रत्येक टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून यासाठीही स्वतंत्र 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

मीरा भाईंदर विधानसभा ( 145 ) मतदारसंघातील मतमोजणीसाठी 33 फेऱ्या, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 34 फेऱ्या, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 24 फेऱ्या, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 26 फेऱ्या, 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 31 फेऱ्या, 151 बेलापूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण 28 फेऱ्या होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली आहे.

हेही वाचा – पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही, रवींद्र धंगेकारांची रोखठोक भूमिका

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण एक हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर एकूण 650 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली त्याचप्रमाणे मतमोजणी  प्रक्रियाही सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे जायभाये यांनी म्हटले आहे.

कल्याण लोकसभा मतदार ( 24  ) संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे मतदान 20 मे रोजीच संपन्न झाले होते. कल्याण लोकसभा मतदार संघातील मतमोजणीला डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी या बंदीस्त क्रीडागृहात 4 जून रोजी सकाळी 8 पासून प्रारंभ होणार आहे.

या मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबीर दि. 28 मे रोजी डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात संपन्न झाले. आता मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर ( रंगीत तालीम ) दि. 03 जून रोजी सकाळी 06.00 वाजता डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात ठेवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button