Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Important news: महापालिका निवडणूकांचे बिगुल पुढील तीन महिन्यात वाजणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा स्वबळावर लढणार!

पिंपरी-चिंचवड : शिर्डीत सुरू असलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळातील महापालिका निवडणुकांबद्दल संकेत दिले आहे. पुढील तीन महिन्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजणार असे सांगत त्यांनी एकप्रकारे कामाला लागा असे सांगितले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकिय राजवटीत असलेल्या पिंपरी चिंचवड मधील इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ प्रशासकीय राजवट आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहरांमधील भाजप महायुतीला घवघवीत यश मिळाले तिन्ही जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. भाजपकडे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे हे सुद्धा नियुक्त आहेत. भोसरी मधून आमदार महेश लांडगे तर चिंचवड मधून शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नुकतेच शंकर जगताप यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांची तिसरी टर्म असून ‘मायक्रो प्लॅनिंग’ त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवण्याची तयारी भाजपने केलेली आहे.

विरोधकांमध्ये मरगळ;निवडणुकांना सामोरे जाण्याचे आव्हान

तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांची ताकद नगण्य म्हणावी अशाच स्वरूपात आहे. विधानसभेत मिळालेल्या अपयशामुळे या तीनही पक्षांमध्ये प्रचंड मरगळ आलेली दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात संघटनात्मक बदल करून महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्याचे आव्हान या पक्षांसमोर असणार आहे.

विधानसभेतील यश महापालिकेत कन्व्हर्ट होणार

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे भाजपमधील इच्छुकांचे इनकमिंग प्रचंड आहे. तर दुसरीकडे विधानसभेत महायुतीला मिळालेले यश महापालिका निवडणुकीतही कन्व्हर्ट करून घेण्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button