Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समधून एक्झिट; पंजाब किंग्सच्या ताफ्यात दाखल, रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार?

Hardik Pandya IPL 2027 Trade | इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) २०२७ च्या हंगामापूर्वी क्रिकेट विश्वात सर्वात मोठी घडामोड घडली आहे. मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) या दोन फ्रँचायझींमध्ये खेळाडूंची मोठी अदलाबदल (Trade Deal) झाली असून, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आता पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे, तर पंजाबचा हुकमी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. दोन्ही संघांमधील ही ट्रेड डील १८ कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाली असून, ११ नोव्हेंबर रोजी आयपीएलने अधिकृत घोषणा करत या करारावर शिक्कामोर्तब केले आहे.

हार्दिक पंड्याने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधूनच आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि या संघासोबत चार वेळा विजेतेपद पटकावले होते. २०२२ मध्ये गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या हंगामातच चॅम्पियन बनवल्यानंतर, २०२४ मध्ये मुंबईने हार्दिकला १५ कोटी रुपयांमध्ये ट्रेड करून पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले होते आणि रोहित शर्माला हटवून त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले होते. मात्र, या निर्णयावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती; वानखेडे स्टेडियमवरही हार्दिकला प्रेक्षकांच्या रोषाचा आणि हूटिंगचा सामना करावा लागला होता. तसेच, हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईला अपेक्षित कामगिरी करता न आल्याने आगामी हंगामापूर्वी संघ व्यवस्थापनाने त्याला ट्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्स ही हार्दिकची आयपीएलमधील तिसरी फ्रँचायझी ठरणार आहे.

हेही वाचा

संपादकीय । राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले, तर नेतृत्व कोणाचे आणि राजकीय दिशा कोणती?

रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार?

हार्दिक पंड्याच्या पंजाब किंग्समधील प्रवेशामुळे आता ‘हिटमॅन’ रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी परतण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने विक्रमी पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्याने अखेरचे २०२३ मध्ये संघाचे नेतृत्व केले होते, तेव्हा मुंबईने क्वालिफायर-२ पर्यंत मजल मारली होती. आता तीन हंगामांनंतर रोहित पुन्हा एकदा मुंबईची धुरा सांभाळणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, नव्या ताफ्यात सामील झालेला अर्शदीप सिंग मुंबईच्या वेगवान गोलंदाजीला किती बळकटी देतो आणि पंजाब किंग्सच्या जर्सीत हार्दिक पंड्या कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group