Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमनोरंजन

काव्या मारन आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर अडकले विवाहबंधनात; ग्रीसमध्ये पार पडला शाही सोहळा!

Kavya Maran and Anirudh Ravichander | आयपीएलमधील लोकप्रिय संघ ‘सनरायझर्स हैदराबाद’ची (SRH) सह-मालकीण काव्या मारन आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा संगीतकार अनिरुद्ध रविचंदर अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रीसमध्ये अत्यंत दिमाखदार आणि शाही पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. अनिरुद्धने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचा खास फोटो शेअर करत, “आज ती आयुष्यभरासाठी माझी झाली. ११.११.” अशी भावनिक पोस्ट लिहून आपल्या आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

विवाह सोहळ्यापूर्वी १० नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्येच या दोघांचा पारंपरिक पद्धतीने साखरपुडा पार पडला. या अत्यंत खाजगी सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि निवडक दिग्गज पाहुणे उपस्थित होते. यामध्ये अनिरुद्धचे नातेवाईक, सुपरस्टार रजनीकांत, ऐश्वर्या रजनीकांत, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांचा समावेश होता. ‘सन टीव्ही’च्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंटवरूनही या शाही लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

हेही वाचा

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या

कोण आहेत काव्या मारन?

काव्या मारन या प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘सन ग्रुप’चे चेअरमन कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत. त्या सध्या ‘सन टीव्ही नेटवर्क’च्या कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच आयपीएलमधील ‘सनरायझर्स हैदराबाद’ संघाच्या त्या सीईओ आणि सह-मालकीण आहेत. आयपीएल सामन्यांदरम्यान स्टँडमधून आपल्या संघाला प्रोत्साहन देतानाचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात.

कोण आहे अनिरुद्ध रविचंदर?

अनिरुद्ध रविचंदर हा भारतीय आणि प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी व लोकप्रिय संगीतकारांपैकी एक आहे. २०१२ मधील ‘व्हाय दिस कोलावेरी डी’ या गाण्याने त्याला जगभरात ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने ‘जेलर’, ‘विक्रम’, ‘लिओ’ आणि शाहरुख खानच्या ‘जवान’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना सुपरहिट संगीत दिले आहे.

२१ नोव्हेंबरला चेन्नईत भव्य रिसेप्शन

ग्रीसमधील लग्नानंतर आता नवदांपत्याचे २१ नोव्हेंबर २०२६ रोजी चेन्नई येथे भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्गज राजकीय नेते, आघाडीचे उद्योगपती आणि क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group