Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
‘आम्ही सत्तेत आल्यापासून लोक..’; गुलाबराव पाटलांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजप युती सरकार आल्यापासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याचं वारंवार विरोधी पक्षाकडून बोललं जात आहे.
दरम्यान, पाणूपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सरकारबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. ते जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात चर्मकार समाजाचा मेळाव्यात बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आत्ताचा पाऊस हा अवेळी पडणारा पाऊस आहे, त्यामुळे आम्ही तर पंचनाम्यामध्येच गुंग आहोत सध्या. मागच्या अडीच वर्षात तुमच्याबरोबर होतो. आम्ही सत्तेत आल्यापासून लोकं पण विस्कळीत आहेत आणि देव पण विस्कळीत आहे.




