शिंदे-फडणवीस सरकारचा गतिमान कारभार, जाहिरातबाजीसाठी ५३ कोटींच्या खर्चास मान्यता
![Govt approves expenditure of 53 crores on its door advertisements](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/eknath-shinde-and-devendra-fadnavis-1-780x470.jpg)
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सत्तेवर आल्यावर राज्यातील जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून महिनाभराच्या कालावधीत सरकारतर्फे माहिती व जनसंचालनालय विभाग प्रयत्न करणार आहे.
या उपक्रमात वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या, रेडिओ, समाजमाध्यमे तसेच नवमाध्यमे यांच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी ५२ कोटी ९० लाख ८० हजार २४० रुपयांच्या खर्चास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वित्तीय व प्रशासकीय मान्यता दिली आहे.
हेही वाचा – २ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी SBI चा मोठा निर्णय, गाईडलाईन्स केल्या जारी
यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील बोलताना म्हणाले की, शासन आपल्या दारी’या उपक्रमात भाजप पदाधिकाऱ्यांना नियोजनात सहभागी करून घ्या, तसेच योजनांची माहिती पोहचविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असणारी पत्रके काढा, प्रत्येक प्रभागात व गावात पोहचताना भाजप कार्यकर्ते बरोबर ठेवा, कोणी या कार्यक्रमास आक्षेप घेतला तर त्याला माझे नाव सांगा, असे म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शासकीय कामातून भाजपच्या प्रचाराची आखणी केली.