Pune : कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश
![Gangster Sharad Mohol's wife joins BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/chandrakant-patil-2-780x470.jpg)
पुणे : पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्ष प्रवेश सुरू झाले आहेत. भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत आज कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
२०२१ मध्ये चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली होती. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला होता. यात स्वाती मोहोळ यांचा देखील सहभाग होता. पुण्यात या प्रसंगावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली होती. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता. पासेस वगैरे नव्हते, असं म्हणत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्याच हातांनी चंद्रकांत पाटील यांनी स्वाती मोहोळ यांना कमळ सोपवले आहे. त्यामुळे स्वाती मोहोळ यांच्या प्रवेशानंतर आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.