ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

अजितदादांच्या आदेशानुसार खासदार श्रीरंग बारणे यांना पूर्ण सहकार्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांची माहिती

तळेगाव दाभाडे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांची तळेगाव दाभाडे येथे सदिच्छा भेट घेतली. बारणे यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, देहूगाव शहर प्रमुख सुनील हगवणे, मावळ तालुका संघटक सुनील तथा मुन्ना मोरे आधी पदाधिकारी होते.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष संदीप कारके, पवन मावळो अध्यक्ष भरत भोते, आंदर मावळ अध्यक्ष रूपेश घोजगे, खरेदी विकी संघाचे सभापती शिवाजी असवले,प्रदेश चिटणीस विक्रम कदम, प्रवक्ते राज खांडभोर, उपाध्यक्ष प्रशांत भागवत,‌सरचिटणीस सुहास गरूड, केशव कुल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारणे व खांडगे यांच्यात चर्चा झाली. मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी होऊ, असा विश्वास बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button