breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

कचरा संकलन केंद्राचा डाव उधळून लावू; सोसायटी फेडरशेनचा इशारा

मोशीतील सोसायटीजवळ प्रशासनाचे कचरा संकलन केंद्र?

पिंपरी : मोशी येथील सिल्व्हर-९ या सहकारी गृहरचना संस्थेच्या जी बिल्डिंग शेजारी पिंपरी चिंचवड महापालिकेची मोकळी जागा आहे. या ठिकाणी कचरा संकलन केंद्र किंवा कचरा विलगीकरण केंद्र करू नये, अशी मागणी चिखली, मोशी, पिंपरी-चिंचवड हौसिंग फेडरेशनच्या वतीने करण्यात आली. सदरच्या मोकळ्या आरक्षित जागेत उद्यान विकसित करण्याची मागणी फेडरेशनच्या वतीने आयुक्‍त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कचरा संकलन केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास हा डाव उधळून लावू, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

फेडरेशनच्या पुढाकाराने तसेच मोशी येथील स्वराज सोसायटी, शुभयोग सोसायटी, सिल्व्हर-९ सोसायटी, प्रिस्टीन ग्रीन फेज १,२,३, स्वदेशा सोसायटी या सर्व सहकारी गृहरचना संस्थांच्या मार्फत आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिल्व्हर-९ सहकारी गृहरचना संस्था जी बिल्डिंगच्या शेजारी पिंपरी चिंचवड महापालिकेचा मोकळा भूखंड आहे. या भूखंडावर कचरा संकलन केंद्र, कचरा विलगीकरण केंद्र करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाच्या सुरू असल्याची माहिती समजते आहे. त्या बाबत १६ ऑगस्ट रोजी या परिसरातील सर्व सोसायट्यांच्या सदस्यांबरोबर सामूहिक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. या वेळी या जागेवर कोणत्याही प्रकारचा कचरा डेपो, कचरा संकलन केंद्र, कचरा विलगीकरण केंद्र होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Urfi Javed : ‘तुला लवकरच गोळ्या घालू’ उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

अधिकाऱ्यांकडून ही स्पष्टता दिली आहे. मात्र भविष्यात देखील या ठिकाणी राहणाऱ्या सोसायटी धारकांचा विचार करून कोणतेही कचरा संकलन केंद्र, किंवा कचरा विलगीकरण केंद्र उभारू नये. तसा प्रयत्न झाल्यास या सर्व गोष्टीला फेडरेशनच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.

…तर साथीचे आजार पसरतील!

सिल्व्हर-९ या सहकारी गृहरचना संस्थेच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या भूखंडावर कचरा संकलन केंद्र होऊ नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. तसा निर्णय झाल्यास त्याचा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. पावसाळ्यात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतील. या भीतीमुळे या ठिकाणी कचरा संकलन केंद्र नको, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. त्याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकींमध्ये सर्व नागरिकांनी एकमताने याला विरोध केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button