breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

१६२५ उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद, मतदान कमी झाल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक

मुंबई : नागपूर, चंद्रपूरसह पूर्व विदर्भातल्या ५ जागांवर आज मतदान पार पडलं. पण मतदानाची टक्केवारी फक्त ५५ टक्के इतकी राहिली. त्यामुळं कमी मतदानाचा फटका कोणाला बसेल, यावरुन आता उमेदवारांमध्ये धाकधूक असेल. पूर्व विदर्भातल्या ५ जागांसह देशातल्या एकूण १०२ जागांवर आज मतदान पार पडलं. महाराष्ट्रात जवळपास ५ जागांवर ५५.२९ टक्के मतदान झालंय. सर्वात कमी मतदान नागपुरात झालंय. ४९.०७% मतदानाची नागपुरात नोंद झालीये. चंद्रपुरात ५५.११%, रामटेकमध्ये ५२.३८% , भंडारा-गोंदियामध्ये ५६.८७%, आणि गडचिरोली-चिमूरमध्ये ६५.९७% मतदान झालंय.

पहिल्या टप्प्यातल्या मतदानात महाराष्ट्राचा विचार केला तर नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. नागपुरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी, काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांनीही आई आणि पत्नीसह मतदान केलं. नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मतदान केलं. आपआपल्या मतदारसंघात उमेदवारांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भंडाऱ्यात तर वडेट्टीवारांनी चंद्रपुरात मतदानाचा हक्क बजावला.

या ५ जागांपैकी हाय प्रोफाईल सीट नागपूर इथं भाजपच्या नितीन गडकरींचा सामना काँग्रेस विकास ठाकरेंशी आहे. गडकरींनी ५ लाख मतांसह रेकॉर्डब्रेक मतांनी विजयाचा दावा केलाय. विकास ठाकरेंनी नागपूरच्या जनतेनं सरकार विरोधात मतदान केल्याचं म्हटलंय.

हेही वाचा – ‘रुप पाहतां लोचनी’, वर्ध्यात मोदींची अभंगवाणी, पंतप्रधानांकडून संतांचं स्मरण

नागपूरनंतर दुसरा मतदारसंघ आहे चंद्रपूर. इथं भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांची लढत, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांशी आहे. मुनगंटीवारांसाठी चंद्रपूरची जागा प्रतिष्ठेची आहे. रामटेकमध्येही मतदान पार पडलं. इथं शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंमध्ये मुख्य फाईट आहे. भंडारा गोंदियात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसच्या प्रशांत पडोळेमध्ये सामना आहे. इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भंडारा हा नाना पटोलेंचा गृहजिल्हा आहे. पूर्व विदर्भातली ५ वी जागा म्हणजे, गडचिरोली चिमूर. इथं भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान आमने-सामने आहेत.

महाराष्ट्रातल्या ५ जागांसह एकूण २१ राज्यात १०२ जागांवर मतदान पार पडलंय. ज्यात तामिळनाडूच्या सर्व ३९ जागांचा समावेश आहे. उत्तराखंडच्या सर्व ५ जागांवरही मतदान झालं. त्याचबरोबरच राजस्थानच्या १२ जागा, अरुणाचल प्रदेश-२, बिहार-४ आसाम-५ छत्तीसगड-१ मध्य प्रदेशची-६ महाराष्ट्र-५ मणिपुर-२ मेघालय-२ मिजोरम-१ नागालँड-१ सिक्किम-१ त्रिपुरा-१ उत्तर प्रदेश-८ पश्चिम बंगाल-३ अंदमान-निकोबार-१ जम्मू-कश्मीर१ लक्षद्वीप-१ पुडुचेरीच्या एका जागेवर मतदान झालं.

२०१९च्या तुलनेत विचार केला तर याच १०२ जागांवर २०१९* ला भाजपनं ६०, काँग्रेसनं ६५ जागांवर उमेदवार दिले होते. तामिळनाडूत डीएमकेनं २४ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी भाजपनं ४० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला १५ जागांवर विजय मिळाला होता. तर डीएमकेनं पहिल्या टप्प्यातील २४ पैकी २४ जागा जिंकल्या होत्या. बसपानं ३ आणि समाजवादी पार्टीनं २ जागा जिंकल्या होत्या.

१०२ जागांवर तब्बल १६२५ उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालंय. आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 तारखेला आहे. ज्यात महाराष्ट्रातील ८ जागांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button