Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यातील कोणत्या विभागात किती पाणीसाठा शिल्लक?

Dams Water Storage : शेतकऱ्यांचं टेंशन वाढणारी बातमी समोर आली आहे. यंदाच्या वर्षी राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भासणार आहे. कारण राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर आली आहे. यामध्ये मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा असल्याचे समोर आले आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा कमीच असल्याचे समोर आलं आहे. तसेच औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे ३७ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन योग्यरीत्या करावे लागणार आहे.
हेही वाचा – ‘आपण जरांगेंचं ऐकायला पाहिजे’; छगन भुजबळांचा खोचक टोला
कोणत्या विभागात किती पाणीसाठा?
- पुणे विभाग – ६७ टक्के
- नाशिक विभाग – ६८ टक्के
- अमरावती विभाग – ७४ टक्के
- नागपूर विभाग – ६९ टक्के
- कोकण विभाग – ७९ टक्के
- औरंगाबाद विभाग – ३७ टक्के.