काँग्रेसला मोठा धक्का! माजी मंत्री नसीम खान यांची स्वपक्षावर टीका, प्रचारालाही नकार
![Ex-minister Naseem Khan refused the campaign making big allegations](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Nasim-Khan-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी स्वपक्षावरच टीका करत लोकसभेचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेसला मुस्लीमांची मते तर हवी असतात, पण त्यांना उमेदवारी का नाही? असा प्रश्न उपस्थित करून नसीम खान यांनी आपली नाराजी उघड केली आहे.
हेही वाचा – ‘मला अडकवण्यासाठी केसापासून नखापर्यंत…’; फडणवीसांचा मोठा आरोप
नसीम खान यांनी खरगेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ते लोकसभा मतदानाचे जे टप्पे उरले आहेत, त्याच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. यासाठी नसीम खान यांनी दोन कारणे दिली आहेत. पहिले म्हणजे, महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिलेला नाही.
दुसरे कारण म्हणजे, राज्यातील अनेक मुस्लीम संघटना, नेते आणि पक्षातील कार्यकर्ते यांना अपेक्षा होती की, काँग्रेस पक्ष तरी निदान एखाद्या मुस्लीम नेत्याला उमेदवारी देईल. पण दुर्दैवाने काँग्रेसनेही उमेदवारी दिलेली नाही, असं नसीम खान यांनी पत्रात म्हटलं आहे.