breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

भाजपकडून सर्व हेलिकॉप्टर्स बुक, डिसेंबरमध्येच निवडणुका? ममता बॅनर्जींचा मोठा दावा

Mamata Banerjee : आगामी लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ शकतात, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. यासोबतच भाजपने निवडणूक प्रचारासाठी सर्व हेलिकॉप्टर आधीच बुक केल्याचंही त्या म्हणाल्या. केंद्रात भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळाल्यास देशआत निरंकुश सरकारचा धोता निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, भारतातील विद्यमान लोकसभेची मुदत २०२४ मध्ये संपत आहे. भाजपाने आतापासून देशभरातील हेलिकॉप्टर्स बुक करून ठेवले आहेत. जेणेकरून निवडणुकीची घोषणा झाली तर इतर राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध होऊ शकणार नाहीत.

हेही वाचा – Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राचं सावट? शुभ मुहूर्त जाणून घ्या..

भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आल्यास, देशाला निरंकुश राजवटीला सामोरे जावे लागेल. मला भीती वाटते की, ते (भाजप) लोकसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्येच घेऊ शकतात. त्यांनी देशातील समाजांमध्ये आधीच कटुता निर्माण केली असून, ते सत्तेवर परतले, तर आपला देश द्वेषाचे राष्ट्र बनेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

इतर राजकीय पक्षांना प्रचारासाठी वापर करता येऊ नये, यासाठी भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व हेलिकॉप्टर आधीच बुक केली आहेत. आम्ही बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (सीपीआय-एम) तीन दशकांची सत्ता संपवली आणि आता लोकसभा निवडणुकीत भाजपचाही पराभव करू, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button