एकनाथ शिंदेंकडून मनसेच्या उमेदवारांवर जाळे ? गमावलेली ताकद मिळवण्याची जोरदार तयारी

ठाणे : भाजपच्या आक्रमक पक्षविस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना पिछाडीवर गेली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सतत्याने पक्ष प्रवेश करुन घेत असल्याने, शिंदेसेनेमध्ये प्रचंड अवस्थता दिसून येत आहे. भाजपचा आक्रमक पक्षविस्तार पाहता, भाजपने २०२९ च्या स्वबळाची तयारी सुरु केली असल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे. भाजपच्या आक्रमक धोरणासमोर आपला निभाव लागत नसल्याचे दिसून आल्यानंतर, आपली शक्ती वाढविण्यासाठी शिंदेसेनेने आता मनसेचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांना पक्षात घेण्यासाठी जाळे टाकले असल्याचे दिसून आले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे यांचा थेट पक्षात प्रवेश करुन घेतला. त्यामुळे भाजपची कल्याण-डोंबिवलीतील ताकद चांगलीच वाढली. शिंदेसेनेला आता पाथर्ली, गोग्रासवाडी या भागामध्ये नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत.
त्यामुळेच शिंदेसेनेने आता आपली चाल बदलताना, मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक मनोज घरत, मंदा पाटील यांच्यासाठी जाळे जावल्याची चर्चा सुरु झाली आहे. आमदार राजेश मोरे यांनी थेट संपर्क साधताना, शिंदेसेनेतील प्रवेशाची विचारणा केली असल्याची देखील बोलले जात आहे.
हेही वाचा – बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचा आता ‘‘बंदोबस्त’’
शिंदेसेनेपुर्वीच दोन्ही माजी नगरसेवकांशी भाजपने संपर्क साधला होता. त्यामुळे मनोज घरत व मंदा पाटील कशा प्रकारचा निर्णय घेतात, हे अजून गुलदस्त्यात आहे. त्या दोघांनीही सध्या वेट ॅड वॉचचे धोरण स्विकारले आहे. मनोज घरत व मंदा पाटील हे दोन्ही मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे निकटवर्तीय समजले जातात.
त्यात मंदा पाटील या राजू पाटलांच्या कुटुंबातील सदस्य आहेत, त्यामुळे त्या कोणत्याही निर्णयापूर्वी राजू पाटील यांच्याशी सल्लामसलत करतील, हे निश्चित आहे. दोन्ही नगरसेवकांनी पक्षबदलाचा निर्णय घेतला तर तो राजू पाटलांसाठी मोठा धक्का असणार आहे. राजू पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणूकीत मनसेकडून निवडूण आलेले एकमेव आमदार होते.




