देशात नवीन कामगार संहिता लागू; केंद्रीय श्रममंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशात चार नव्या श्रम संहिता लागू करणार असल्याची घोषणा केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे
या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस 2019, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड 2020, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 याचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 29 कायद्यांमध्ये सुधारणांसाठी या संहिता लागू करण्यात आल्या आहेत.
नव्याने लागू होणारी कामगार संहिता ही केवळ कायदेशीर सुधारणा नाही तर, भारतातील 40 कोटींहून अधिक कामगारांच्या जीवनात एक ऐतिहासिक क्रांती असल्याचे सरकारने म्हटले आहे.
नवीन कामगार संहितेत काय म्हटले आहे?
-सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी.
-प्रत्येक तरुणासाठी नियुक्ती पत्र अनिवार्य आहे.
-महिलांना समान वेतन आणि समान आदर
-40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच
-फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना फक्त १ वर्षानंतर ग्रॅच्युइटी
-40 वर्षांवरील कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी
-ओव्हरटाईमसाठी दुप्पट पगाराची हमी
-धोकादायक क्षेत्रांमध्ये 100% आरोग्य सुरक्षा
-इंटरनेशनल मानकांवर आधारित श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी
हेही वाचा – एकनाथ शिंदेंकडून मनसेच्या उमेदवारांवर जाळे ? गमावलेली ताकद मिळवण्याची जोरदार तयारी
मोफत आरोग्य तपासणी
40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ओव्हरटाइमसाठी दुप्पट वेतन मिळण्याची तरतूद नव्या संहितेत आहे. तर, धोकादायक क्षेत्रातील कामगारांना यापुढे 100 टक्के आरोग्य सुरक्षा मिळणार आहे.
कोणाला होणार फायदा?
नवीन कामगार संहितांमध्ये अशा सुधारणांचा समावेश आहे ज्यामुळे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार, महिला कर्मचारी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (MSME) काम करणाऱ्यांना लक्षणीय फायदा होणार आहे. कारण पहिल्यांदाच लेबर कोड्समध्ये गिग वर्क, प्लेटफॉर्म वर्क आणि अॅग्रीगेटर्सची परिभाषा निश्चित करण्यात आली आहे.
महिलांना मिळणार अधिक लाभ
नव्या कामगार संहितेत मातृत्व लाभ अधिक मजबूत करण्यात आले आहेत. त्यानुसार आता महिलांना 26 आठवड्यांची पगारी रजा, पाळणाघर सुविधा आणि घरून काम करण्याचे लवचिक पर्याय मिळणार आहेत. त्याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना 3500 हजारांचा वैद्यकीय बोनसदेखील मिळणार आहे.




