‘जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई | मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करणारा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे सुपूर्द केला. त्यावर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, मराठा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल सुपूर्द करण्यात आला असून या अहवालावर विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हेही वाचा – मराठा समजाला पुन्हा फसवणार आहात का? मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर काँग्रेस नेत्याचा सवाल
मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असंही आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यासोबतच महत्त्वाचे म्हणजे जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की १९६७ पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी त्याचा वेगळा नियम आणि कायदा आहे. नवे मराठा आरक्षण हे कोणत्याही नोंदी नसणाऱ्यांना मिळणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजेच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे.





