breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आठ तासांमध्ये मी १० हजार फाईलींवर सह्या करतो’; एकनाथ शिंदेंचं विधान

मुंबई | विधानसभा निवडणुक काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं एका विधानाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आठ तासांत मी १० हजार फाईलींवर सह्या करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारने एका रुपयामध्ये पीक विमा योजना सुरु केली आहे. शेतकऱ्याने एक रुपया द्यायचा बाकीचे पैसे सरकार भरणार, आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आणि कापसालाही पैसे देण्याचे काम सुरु केले आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल देखील माफ करण्याचं काम आपण केलं. कल्याणकारी योजना देण्याचं काम सरकार करत आहे. आम्ही देखील गरीबी पाहिली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले, त्याचा आम्ही काहीतरी व्यवसाय सुरु केला असं अनेक बहिणी सांगत आहेत. अनेक बहिणी त्यांच्या घरात काही खरेदी करतात. याचा अर्थ हे पैसे चलनात येतात आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला फायदा देखील होईल.

हेही वाचा    –      पुनावळे, ताथवडे आणि वाकडमध्ये रस्ते विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी

आम्ही आता ठरवलं आहे की लाडक्या बहि‍णींना लखपती केल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच लाडक्या भावांसाठी देखील रोजगार देण्यासाठी योजना आणली आहे. तसेच मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र योजना देखील सुरु केली आहे. कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्यामुळे आपण शासन आपल्या दारी योजना सुरु केली. त्याचा पाच कोटी लोकांना लाभ मिळाला. याआधीही लाभार्थी होते, योजनेचा लाभ मिळत होता. पण लोक याचा लाभ घेता घेता कंटाळून जात होते. सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हणून सोडून द्यायचे. त्यामुळे आता आम्ही शासन लोकांच्या घरी नेण्याचे काम केलं, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

शेती करायला गावाकडे गेलं की आमच्यावर काहीजण टीका करतात. विरोधक मला म्हणतात की हेलिकॉप्टरने शेती करायला जातो. मग आता गावी शेती करायला गाडीने जाऊ का? मग १० तास लागतील किंवा ८ तास लागतील. आठ तासांमध्ये मी १० हजार फाईलींवर सह्या करतो. एवढा वेळ माझ्याकडे नाही, तुमच्याकडे होता. कारण तुमचे पाय कधी जमिनीला लागलेच नाहीत. मात्र, मी मातीतला आणि जमिनीवरला माणूस आहे. त्यामुळे गावी गेलं की माझे पाय आपोआप शेताकडे ओळतात, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button