Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे देखील रक्षण होणार आहे. ‘बेस्ट’ ही मुंबईची जीवनवाहिनी असून उपनगरीय लोकल रेल्वे, मेट्रो ट्रेन यांना प्रवाशांशी जोडण्यासाठी बस सेवा महत्त्वाची आहे. या बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BEST)च्या कुलाबा येथील आगारात मुख्यमंत्री  फडणवीस यांचे हस्ते 150 नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी, अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. आर. डुबल व ए.एस. राव , मुख्य अभियंता राजन गंदेवार, मुख्य वाहतूक व्यवस्थापक रमेश मडावी उपस्थित होते.

हेही वाचा –  “…म्हणून मी शिवसेना सोडली”, नारायण राणेंनी सांगितलं कारण; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने 5 हजार बसेस घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला आहे. त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  मुंबई वन ॲपच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी  ‘सिंगल तिकीट सिस्टीम’ आणण्यात आली आहे. प्रवासी भाड्याचे उत्पन्न  जास्त असेल तर बेस्ट आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. यासाठी हे उत्पन्न जास्तीत जास्त वाढविण्यासाठी काम केले जावे, अधिक व्यावसायिक दृष्टिकोन आणला जावा. ‘बेस्ट’ सक्षमीकरणासाठी राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका तत्पर आहेच, असा आश्वासक दिलासा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

‘बेस्ट’ साठी प्रवासी सुविधा वाढवितानाच व कर्मचारी हिताचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीतील योगदान, कोविड काळातील लाभाच्या निधीची रक्कम देण्यात आली आहेत. याचबरोबर यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याइतकाच बोनस ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. कर्मचारी आनंदी असतील तर ही प्रवासी सेवा अधिक चांगली कार्यक्षम राहील, असे  मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button