breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

जिल्हा कबड्डी संघटनेच्या निवडणूक परिवर्तन पॅनल लढविणार

१९ जागा परिवर्तन पॅनल लढविणार, निवडणूक २५ फेब्रुवारी २०२३ ला

पुणे : पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे निवडणूक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात येणार असून परिवर्तन पॅनलच्या वतीने ही निवडणूक लढविण्यास येणार असल्याची माहिती परिवर्तन पॅनलचे प्रमुख अर्जुनवीर शांतारामबापू जाधव यांनी दिली.

यावेळी अर्जुनवीर शांतारामबापू जाधव, अध्यक्ष पदाचे उमेदवार बालाजी ढमाले, उमेश गालिंदे, सतपाल गावडे, गणेश बालवडकर, समीर तुपे यांच्यासह सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.

परिवर्तन पॅनलच्या वतीने अध्यक्षपद, उपाध्यापदाची एक जागा, कार्यकारणीच्या १७ जागा लढविणार आहेत. कार्यकारिणीच्या ३१ जागा असून यापैकी एक जागा आजीव सदस्याची आहे. उर्वरित ३० जागांपैकी पुणे शहरातून १८ पैकी ७, पिंपरी चिंचवडच्या ६ पैकी ५ तर ग्रामीणमधून ६ पैकी ५ जागा परिवर्तन पॅनल लढविणार आहे.

कबड्डी या खेळाचा शाश्र्वत विकास व्हावा, खेळाडूना खेळण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळावी, तसेच खेळाडूंच्या समस्या तातडीने सोडविता यावात, यासाठी परिवर्तन पॅनल कटिबद्ध आहे. खेळाडूंच्या अनेक समस्या सोडविण्यात मागील कार्यकारिणी अपयशी ठरली होती, मात्र, परिवर्तन पॅनल खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचे, परिवर्तन पॅनलचे प्रमुख शांताराम जाधव यांनी बोलताना सांगितले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर मिळालेला वेळ हा कमी असल्याने सर्वच ठिकाणी परिवर्तन पॅनलचे उमेदवार देता आले नाहीत. मात्र, परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून उभे असलेले उमेदवार हे कबड्डी खेळासाठी पूर्ण झोकून देवून काम करणारे आहेत, असा मला विश्वास आहे, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button