ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण
‘धर्मवीर 2’ या चित्रपटातील एका सीनवरुन वाद
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी आनंद दिघे यांना मारलं गेलं हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती
![Dharamveer, Film, Controversy, Nirman, Shiv Sena, Shinde, groups, leaders, Sanjay Shirsath, Anand Dighe, Thane, information,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/sanjay-shirsat-780x470.jpg)
ठाणे : ‘धर्मवीर 2′ या चित्रपटातील एका सीनवरुन वाद निर्माण झाला आहे. या सीनमध्ये ठाण्याच्या हॉस्पीटलमधून आनंद दिघे यांची डेडबॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदे यांचे पात्र धावताना दाखविले आहे. हा सीन खरंच घडला होता यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी आनंद दिघे यांना मारलं गेलं हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे.
चांगला ठणठणीत असलेला माणूस लगेच हार्टअटॅकने कसा काय मरु शकतो. या संदर्भातील गोष्टी हळूहळू बाहेर येतील. संजय राऊत हे त्यावेळी सामनात कारकूनगिरी करीत होते, त्यांना काय माहिती आहे. त्यावेळी ते प्रवक्ते काय व्यासपीठावर देखील नसयाचे त्यांना जिथे तिथे आपणच होतो हे सांगायची सवय आहे. एकतरी आंदोलनातला त्यांच्या फोटो दाखवा.हा शिवसेना फोडण्यासाठी मात्र ते होते असा टोलाही संजय शिरसाठ यांनी यावेळी लगावला.