देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकातून राष्ट्रवादी कांग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले,..

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांवर संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस आणि भाजपचे नेते देखील कर्नाटकात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रचारासाठी कर्नाटकात भाजपाचा प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार दिले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकामध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार इथे आहे. हा पक्ष काय डोंबलं करणार आहे इथे येऊन? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, बंगालमध्ये भाजपाती सत्ता नाही. देशाचा नकाशा पहिल्यास लक्षात येईल की, अनेक राज्यात भाजपा सत्तेवर नाही. इतर राज्यात नॉन भाजपा सरकार आहे. त्याचबरोबर आता कर्नाटकमधील स्थानिक लोक भाजपावर नाराज आहेत, त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असं दिसतंय, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.





